FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकात भारताची एंट्री! उपराष्ट्रपति जगदीप धनखर हे देशाचे करणार प्रतिनिधित्व
देशाचे उपराष्ट्रपति जगदीप धनखर हे 20 नोव्हेंबर रोजी कतार येथे होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारतीय फुटबॉल संघाचे नव्हे तर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
फीफा विश्वचषक 2022 (FIFA WC 2022) कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या जागतिक स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होत आहेत. भारताचा संघ त्याचा भाग नाही, तरीही तुम्ही विचार करत असाल की भारताची एंट्री कशी होणार? काय आहे बातमी सांगूया. खरं तर, देशाचे उपराष्ट्रपति जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) हे 20 नोव्हेंबर रोजी कतार येथे होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारतीय फुटबॉल संघाचे नव्हे तर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, उपराष्ट्रपती त्यांच्या कतार दौऱ्यात भारतीय समुदायाच्या सदस्यांचीही भेट घेणार आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते भारताचे प्रतिनिधित्व करणार असून भारतीय फुटबॉल संघ नसला तरी तेथे उपस्थित राहणे ही देशासाठी अभिमानाची बाब असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)