Asian Games 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाचा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश
भारतीय महिला संघाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश झाल्यामुळे आता आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताचे एक मेडल नक्की झाले आहे.
मलेशियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसीच्या चांगल्या क्रमवारीच्या आधारे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासामन्यात भारताने प्रथम फंलदाजी करत 15 षटकांत 173 धावा केल्या होत्या. शेफालीने 39 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या, तर जेमिमाने 29 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या, ज्यात तिने सहा चौकार मारले. रिचा घोषने 7 चेंडूत 21 धावांची तुफानी खेळी खेळली. पंरतू पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना आता रद्द करण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)