IND vs AUS 3rd Test: भारताने नाणेफेक जिंकली, घेतला फलंदाजीचा निर्णय

टीम इंडियाने पहिले दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. पण हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

IND vs AUS (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आजपासून इंदूरमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाने पहिले दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. पण हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. केएल राहुलच्या जागी गिलला स्थान मिळाले आहे. शमीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी उमेश यादव प्लेइंग इलेव्हनचा भाग बनत आहे.

ऑस्ट्रेलियन संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियात परतल्यामुळे या कसोटीचा भाग नाहीत. वॉर्नरची जागा कॅमेरून ग्रीनने घेतली आहे. स्टार्कने कमिन्सची जागा घेतली आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडे वेगवान गोलंदाजीचा अतिरिक्त पर्याय आहे.

इंदूर कसोटीसाठी दोन्ही संघ

भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (क), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement