Commonwealth Games 2022 Updates: भारत 13 पदकांसह पदकतालिकेत सहाव्या स्थानावर, वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदके

भारताच्या पदकतालिकेत अजूनही वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदके आहेत. आतापर्यंत एकूण 13 पदक भारताच्या नावावर आहे.

Photo Credit - Twitter

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी चांगली कामगिरी करत भारतीय संघाने एकूण चार पदके जिंकली. यासह भारताच्या पदकतालिकेत एकूण 13 पदके आहेत. भारताने पाचव्या दिवशी लॉन बॉल आणि टेबल टेनिसमध्ये सुवर्ण, वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य आणि पाचव्या दिवशी मिश्र बॅडमिंटनसह एकूण 4 पदके जिंकली. लॉन बॉलमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. भारताच्या पदकतालिकेत अजूनही वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदके आहेत. आतापर्यंत एकूण 13 पदक भारताच्या नावावर आहे.

इवेंट्स   गोल्ड   सिल्वर    ब्रॉन्ज 
वेटलिफ्टिंग 3 3 2
जूडो 0 1 1
बैडमिंटन 0` 1 0
टेबल टेनिस 1 0 0
लॉन बॉल 1 0 0

कॉमनवेल्थ गेम्सच्या 6 व्या दिवशी, एकूण 11 अंतिम स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदकांच्या आशा करताना दिसतील. आतापर्यंत 13 पदकांसह भारत पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 5 व्या दिवशी 4 पदके जिंकूनही, पदकतालिकेत भारताचा क्रमांक 5 व्या दिवशी सारखाच राहिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement