IND vs AUS: कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारताचा ऑस्ट्रेलियावर पगडा जड, घेतली 144 धावांची आघाडी
भारताकडून रोहित शर्माने शतकीय पारी खेळली आहे तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतक केले आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा (Border-Gavaskar Trophy) हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 24 षटकांत एक गडी गमावून 77 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 63.5 षटकात अवघ्या 177 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. पहिल्या डावात टीम इंडिया 321 धावा केल्या आहे तर तसेच 144 एवढ्या धावाची आघाडी घेतली आहे. भारताकडून रोहित शर्माने शतकीय पारी खेळली आहे तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतक केले आहे. हेही वाचा Rohit Sharma ने शतक झळकावून अनेक विक्रम काढले मोडीत, सचिन तेंडुलकरची केली बरोबरी, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवागला टाकले मागे