IND W vs AUS W: उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला T20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्णधार हरमनप्रीत मॅच फिट झाली आणि टॉससाठी मैदानात आली. मात्र, पूजा वस्त्राकर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. भारतीय संघ 2 बदलांसह मैदानात उतरला आहे. पूजा वस्त्राकरच्या जागी स्नेह राणाला संघात स्थान मिळाले आहे, तर राजेश्वरी गायकवाडऐवजी संघ व्यवस्थापनाने राधा यादववर बाजी मारली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)