MS Dhoni Birthday: चाहत्यांकडून CSK चा कॅप्टन महेंद्र सिंग धाेनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,सोशल मीडियावर शुभेच्छा होतोय वर्षावर
महेंद्र सिंग धोनी हा भारतीय क्रिकेट खेळाडू आज 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
MS Dhoni Birthday: सर्वांचा लाडका, प्रसिध्द क्रिकेट खेळाडू महेंद्र सिंग धोनी आज 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सर्वांचा लाडका माही हा भारताचा यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील माहीचा चाहता वर्ग भरपुर आहे. सोशल मीडियावर चाहत्यांवर्गाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वर्षाव केला आहे. माहीची ओळख फक्त आपल्या देशा पुरती नसून त्यांनी स्वत: ची ओळख भारताबाहेर देखील बनवली आहे. अर्थात धोनीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. फक्त धोनी हे नाव क्रिकेट मर्यादीत पुरते नसून जाहीरात क्षेत्रातही ओळखले जाते. त्यांच्या नावाचं आज मोठं ब्रॅंड उभे राहीले आहे. अनेक वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहीराती धोनी करत असतो. धोनीच्या चाहत्यांची क्रेझ भरपुर आहे. भारताचा माजी कर्णधाक महेंद्र सिंग धोनी क्रिकेट पासून लांब आहे त्यांने निवृत्ती घेतल्यानंतर ही त्याचं नाव एक ब्रँड म्हणून चर्चेत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)