Russia Invades Ukraine: माजी हेवीवेट चॅम्पियन Vitali Klitschko रशियाविरुद्ध ‘मैदान-ए-जंग’मध्ये, भाऊ Wladimir ही देणार साथ; रशियाला दिला खुला इशारा
युक्रेनवर रशियाच्या लष्करी हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नागरिकांना शस्त्र हाती घेण्याचे आवाहन केले. यानंतर माजी हेवीवेट चॅम्पियन Vitali Klitschko ने देखील ‘मैदान-ए-जंग’मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्याचा भाऊ Wladimir Klitschko देखील त्याच्या सोबत असेल. हे दोघे दिग्गज बॉक्सर राहिले आहेत आणि आता युद्धाच्या मैदानात रशियन सैन्याविरुद्ध लढण्यास सज्ज आहेत.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने (Russia-Ukraine War) जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Wladimir Putin) कोणत्याही प्रकारे झुकणार नाहीत. अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना शस्त्र हाती घेण्याचे आवाहन केले, तर दोन विश्वविजेते बॉक्सर बंधू आपला देश वाचवण्यासाठी पुढे सरसावले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)