Yuvraj Singh Gifts Virat Kohli Golden Boots: युवराज सिंहने ‘सुपरस्टार’ विराट कोहलीला दिली ‘सुवर्ण’ भेट, म्हणाला - ‘तू माझ्यासाठी चीकूच राहशील’

Yuvraj Singh Gitfs Virat Kohli Golden Boots: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यांनी माजी सहकारी विराट कोहलीला खास ‘गोल्डन’ शूज भेट दिले आहेत. युवीची ही खास भेट विराटच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी आहे. माजी स्टार ऑलराऊंडर युवराजने सोशल मीडियावर कोहलीसाठी एक भावनिक पत्र पोस्ट केले आहे, ज्यामध्ये त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार कोहलीचे समर्थन केले आहे.

Yuvraj Singh Gifts Virat Kohli Golden Boots: युवराज सिंहने ‘सुपरस्टार’ विराट कोहलीला दिली ‘सुवर्ण’ भेट, म्हणाला - ‘तू माझ्यासाठी चीकूच राहशील’
विराट कोहलीला युवराज सिंहकडून ‘गोल्डन बूट’ (Photo Credit: Instagram)

भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने माजी कर्णधार आणि सहकारी विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी खास पत्र लिहिले आहे. या पत्रासोबत युवीने विराटसाठी खास भेटही पाठवली आहे. युवीने या पत्रात लिहिले आहे की, “तू माझ्यासाठी नेहमीच चीकू राहशील आणि जगासाठी किंग कोहली.” विराट कोहलीने सप्टेंबर 2021 आणि जानेवारी 2022 दरम्यान तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधार पदाचा राजीनामा दिला आणि आता तो एक फलंदाज म्हणून खेळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2022 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).