India Beat West Indies: यशस्वी आणि शुभमन गिलच्या दमदार फलंदांजीमुळे भारताने इंडिजचा नऊ गडी राखून केला पराभव, मालिका 2-2 बरोबरीत
चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा नऊ विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील चौथा सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला गेला. चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा नऊ विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 178 धावा केल्या. विंडीजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ६१ धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने अवघ्या 17 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक नाबाद 84 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक एक विकेट घेतली. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना उद्या म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाईल.
4TH T20I. India Won by 9 Wicket(s) https://t.co/kOE4w9V1l0 #WIvIND
— BCCI (@BCCI) August 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 11:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

