WTC 2025 Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद जिंकणारा संघ होणार मालामाल; उपविजेता संघही इतकी रक्कम घरी घेऊन जाणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप शेवटच्या टप्प्त आहे. कोणता संघ जिंकूण ट्रॉफी उंचावेल याकडे सर्वांच लक्ष लागल आहे. दरम्यान, दोन्ही संघ किती रक्कम जिंकतील हे जाणून घेऊयात.

AUS vs SA (Photo Credit- X)

WTC 2025 Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025) स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात खेळला जात आहे. कांगारू संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या सामन्यासाठी तिकीट बुक केले आहे. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेने प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकणाऱ्या संघावर भरपूर पैशांचा वर्षाव होणार आहे. कसोटी क्रिकेटचा विजेता बनणाऱ्या संघाला 30.79 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या उपविजेत्या संघाला 17.96 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. गेल्या वर्षी विजेत्या संघाला 13.23 कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या संघाला 6.61 कोटी रुपये देण्यात आले होते. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाला आयसीसीकडून 12.31 कोटी रुपये मिळतील, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघाला 10.26 कोटी रुपये मिळतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement