World Cup Qualifiers 2023: श्रीलंकेने विश्वचषक 2023 मध्ये आपले स्थान केले निश्चित, 2 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाशी होणार टक्कर
आता तीन संघ एका जागेसाठी स्पर्धेत आहेत. बुलावायो येथे झालेल्या सामन्यात यजमान संघाने श्रीलंकेला 166 धावांचे लक्ष्य दिले होते, ते 33.1 षटकात पूर्ण केले.
श्रीलंका भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (World Cup Qualifiers 2023) पात्र ठरला आहे. विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा नऊ गडी राखून पराभव करून ही कामगिरी केली. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवणारा श्रीलंका हा नववा संघ आहे. आता तीन संघ एका जागेसाठी स्पर्धेत आहेत. बुलावायो येथे झालेल्या सामन्यात यजमान संघाने श्रीलंकेला 166 धावांचे लक्ष्य दिले होते, ते 33.1 षटकात पूर्ण केले. 2023 च्या विश्वचषकात भारताचा सामना 2 नोव्हेंबरला श्रीलंकेशी होणार आहे. तब्बल 151 महिन्यांनंतर विश्वचषकात टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात 2 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर हाय-व्होल्टेज सामना होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)