Women's World Cup 2022: न्यूझीलंड कर्णधार Sophie Devine चे शतक व्यर्थ; रोमहर्षक सामना जिंकून वेस्ट इंडिजची विजयी सलामी, Deandra Dottin ठरली गेमचेंजर

ICC महिला विश्वचषक 2022 चा पहिलाच सामना अतिशय रोमांचक होता. वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर 3 धावांच्या फरकाने मात केली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 9 बाद 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात व्हाईट फर्न्स संघ 256 धावांवर गारद झाला. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 6 धावांची गरज होती, मात्र या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॉटिनने केटी मार्टिनला बाद करून सामन्याचा निकाल फिरवला.

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, महिला वर्ल्ड कप (Photo Credit: Twitter/ICC)

Women's World Cup 2022: न्यूझीलंड (New Zealand) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात महिला विश्वचषकच्या पहिल्या सामन्यात डिएंड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिच्या गेमचेंजर गोलंदाजीच्या बळावर विंडीज संघाने अवघ्या तीन धावांनी विजय मिळवला. डॉटिनने शेवटच्या षटकात आश्चर्यकारक कामगिरी केली. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 6 धावांची गरज होती, मात्र डॉटिनने केटी मार्टिन, जेस केर आणि त्यानंतर जेस जोनास हिला धावबाद करून न्यूझीलंडचा डाव 256 धावांत आटोपला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 259 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement