Asia Cup 2023: पुढील वर्षी आशिया कप खेळण्यासाठी भारत पाकिस्तानला जाणार का? काय असेल सरकारचा निर्णय
टीम इंडिया 2008 पासून पाकिस्तानात फिरकले नसल्यामुळे अनेकांना स्पर्धेतील भारताच्या सहभागावर शंका आली असेल.
भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. पाकिस्तानला आशिया कप 2023 चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली असून बीसीसीआय या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास तयार आहे. मात्र, अंतिम निर्णय सरकारचा असेल. तेथून मान्यता मिळाल्यास 2008 नंतर भारत पुढील वर्षी पाकिस्तानला भेट देऊ शकतो. 2023 आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा पाकिस्तान दौरा, निश्चितपणे तत्कालीन सरकारच्या मान्यतेच्या अधीन असेल, परंतु सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अजेंड्यावर नक्कीच आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)