WI vs IRE ODI 2022: आयर्लंडने उडवला इतिहास, वेस्ट इंडिज संघाला धोबीपछाड देऊन प्रथमच घराबाहेर केली ऐतिहासिक कामगिरी

आयर्लंड क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. जमैका येथील सबिना पार्क येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांची वनडे मालिका आयर्लंडने 2-1 ने जिंकली आहे. आयर्लंडने दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी आयर्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका कधीही जिंकली नव्हती.

वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड (Photo Credit: Twitter/ICC)

आयर्लंड क्रिकेट संघाने (Ireland Cricket Team) इतिहास रचला आहे. जमैका येथील सबिना पार्क (Sabina Park) येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांची वनडे मालिका आयर्लंडने 2-1 ने जिंकली आहे. आयर्लंडने दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला (West Indies) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजच्या संघाने विजयाने सुरुवात केली असली तरी आयर्लंड संघाचा शेवट मात्र विजयाने झाला आहे. आयर्लंडने दुसरा सामना 5 आणि शेवटचा सामना 2 विकेटने जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now