IND vs WI 2nd Test Day 3 Live Score Update: वेस्ट इंडिज संघाला बसला आणखी एक धक्का, कर्क मॅकेन्झी पॅव्हेलियनमध्ये परतला

पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. सलामीवीर कर्क मॅकेन्झी 32 धावा करून मुकेश कुमारला बळी पडला. वेस्ट इंडिज संघाची धावसंख्या 117/2.

IND vs WI 2nd Test Day 3 Live Score Update: वेस्ट इंडिज संघाला बसला आणखी एक धक्का, कर्क मॅकेन्झी पॅव्हेलियनमध्ये परतला

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 41 षटकांत 1 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 128 षटकांत 473 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 121 धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. सलामीवीर कर्क मॅकेन्झी 32 धावा करून मुकेश कुमारला बळी पडला. वेस्ट इंडिज संघाची धावसंख्या 117/2.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2023 08:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).