Watch: क्रिकेटर Ishan Kishan चा MS Dhoni च्या सहीवर आपला ऑटोग्राफ देण्यास नकार; म्हणाला- 'अजून मी त्या लेव्हलला पोहोचलो नाही' (Video)
व्हिडिओमध्ये एक चाहता त्याच्या मोबाईलवर ईशानचा ऑटोग्राफ घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्या चाहत्याच्या मोबाईलवर एमएस धोनीचा ऑटोग्राफ आधीच होता. तो ऑटोग्राफ पाहून ईशान त्याच्यावर ऑटोग्राफ देण्यास मनाई करतो.
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज इशान किशन क्रिकेटच्या मैदानावर रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे, आधी त्याने भारतीय संघाकडून खेळताना धावांचा डोंगर रचला आणि त्यानंतर किशनने रणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम फलंदाजी केली. दरम्यान, इशानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्रकार विमल कुमार यांनी इशान किशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये एक चाहता त्याच्या मोबाईलवर ईशानचा ऑटोग्राफ घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्या चाहत्याच्या मोबाईलवर एमएस धोनीचा ऑटोग्राफ आधीच होता. तो ऑटोग्राफ पाहून ईशान त्याच्यावर ऑटोग्राफ देण्यास मनाई करतो. तो म्हणतो, 'मी अजून एवढा मोठा झालो नाही की माही भाईच्या ऑटोग्राफवर मी माझा ऑटोग्राफ द्यावा.' तो पुढे म्हणतो, 'याच्यावर आधीच माही भाईचा ऑटोग्राफ आहे तिथे मी माझा ऑटोग्राफ देणार नाही.' इशानच्या या वाक्यांनी त्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. इशान किशन सध्या त्याच्या झारखंड संघासाठी रणजी ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)