Chris Gayle Dance Video: ख्रिस गेलचा गुजरात जायंट्सच्या नवरात्रीच्या उत्सवात गरबा डान्स पाहून व्हाल थक्क (Watch Video)

सेहवागच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत आणि सोमवारी त्यांचा एलिमिनेटर सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी गरबा नाईटमध्ये टीमचे सर्व खेळाडू खास पद्धतीने नवरात्र साजरे करताना दिसले.

Chris Gayle Dance Video: ख्रिस गेलचा गुजरात जायंट्सच्या नवरात्रीच्या उत्सवात गरबा डान्स पाहून व्हाल थक्क (Watch Video)
Photo Credit - Twitter

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) केवळ त्याच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध नाही, तर त्याच्या राहणीमानानेही लोकांना भुरळ घातली आहे. सध्या गेल लिजेंड्स लीगमधील गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघाचा भाग आहे. सेहवागच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत आणि सोमवारी त्यांचा एलिमिनेटर सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी गरबा नाईटमध्ये टीमचे सर्व खेळाडू खास पद्धतीने नवरात्र साजरे करताना दिसले. या रात्री, सेहवाग आणि ख्रिस गेलसह इतर सहकारी देखील शानदार कपड्यांमध्ये दिसले. त्याचवेळी ख्रिस गेलच्या जबलदस्त डान्सने सर्वांनाच थक्क केले. गुजरात जायंट्सने गेलच्या या फनी डान्सचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2022 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).