Virat Kohli Century: विराट कोहलीने झळकावले कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक, भारताची धावसंख्या 400 धावांच्या जवळ
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या.
IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. त्याचवेळी चोथ्या दिवसी भारतीय संघाचा डाव सुरू आहे. दरम्यान, भारताचा निम्मा संघ बाद झाला असुन विराट कोहलीने आपले शानदार शतक झळकावले आहे. त्याने 241 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. विराटने आतापर्यंत आपल्या खेळीत पाच चौकार मारले आहेत. भारताची धावसंख्या 400 धावांच्या जवळ पोहोचली आहे. विराट कोहलीने कसोटीतील 28 वे शतक ठोकले आहे. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे.
CENTURY for @imVkohli 🫡🫡
He's battled the heat out here and comes on top with a fine 💯, his 28th in Test cricket. #INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/i1nRm6syqc
— BCCI (@BCCI) March 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2023 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

