Virat Kohli: चिन्नास्वामी मैदानात विराट कोहलीची 'या' विक्रमाला गवसणी
कोहलीच्या या नाबाद खेळीसोबतच त्याच्यानावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झालीय.
आयपीएलच्या (IPL) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरोधातील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय झाला. विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डु प्लेसिसने मुंबईच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. कोहलीने 49 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 82 धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. कोहलीच्या या नाबाद खेळीसोबतच त्याच्यानावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झालीय. कोहलीने या इनिंगसोबत अर्धशतकांचे अर्धशतक म्हणजेच 50 वे अर्धशतक ठोकलं आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम डेविड वॉर्नरच्या नावावर आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)