T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा 'हा' घातक गोलंदांज निवृत्तीचा निर्णय घेणार मागे, Virat Kohli चा आहे मोठा चाहता

वयाच्या 31 व्या वर्षी आमिरने आयसीसी टी-20 विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) काही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला आहे.

Mohammad Amir (Photo Credit - X)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने (Mohammad Amir) आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी (ICC T20 World Cup 2024) स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले आहे. 2020 मध्ये त्याने खेळातून निवृत्ती घेतली, परंतु आता आयसीसी स्पर्धा जवळ आल्याने तो पुन्हा पाकिस्तान संघात स्थान मिळवण्याची इच्छा व्यक्त करत आहे. याआधी इमाद वसीमनेही निवृत्तीनंतर पुनरागमन करण्याबाबत बोलला होता. निवृत्ती घेताना त्याने पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. आता वयाच्या 31 व्या वर्षी आमिरने आयसीसी टी-20 विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) काही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now