Instagram वर Virat Kohli चे झाले 150 मिलिअन फॉलोअर्स; एका स्पेशल पोस्टद्वारे मानले चाहत्यांचे आभार
आपल्या क्रिकेटच्या कौशल्याने मैदानावर राज्य करणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मैदानाबाहेरचाही 'किंग' ठरला आहे
आपल्या क्रिकेटच्या कौशल्याने मैदानावर राज्य करणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मैदानाबाहेरचाही 'किंग' ठरला आहे. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर 150 दशलक्ष फॉलोअर्स असलेला तो केवळ पहिला भारतीयच नाही, तर पहिला आशियाई ठरला आहे. या 32 वर्षीय भारतीय कर्णधाराचे गेल्या शुक्रवारी इन्स्टाग्रामवर 150 दशलक्ष फॉलोअर्स झाले.
आता विराटने यासाठी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये विराटने म्हटले आहे, 'आपल्या सर्वांच्या सपोर्टबद्दल सर्वांचे आभार. 150 दशलक्ष ही खूप मोठी संख्या आहे. हा एक सुंदर प्रवास होता आणि मी तुमच्या सर्वांच्या प्रेमाबाबत खरोखर आभारी आहे.'
विराट कोहलीने मानले चाहत्यांचे आभार-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)