Virat Kohli Gym Video: 'सुट्टी असली तरी धावावे लागेल'; विराट कोहलीचा स्वातंत्र्यदिनादिवशी जिममधील व्हिडिओ व्हायरल (Watch)
आशिया चषक 2023 यावेळी हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे, ज्यामध्ये चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत, बाकीचे सामने श्रीलंकेत होणार आहेत.
बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठी अद्याप संघ जाहीर केला नसून, त्यासाठी आता केवळ 15 दिवस उरले आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आशिया चषकापूर्वी सराव सुरू केला असून त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर व्हायरल होत आहेत. काल विराट कोहलीने सोशल मीडियावर एक जिममधील फोटो शेअर केला होता. आता आज त्याने ट्रेडमिलवर धावतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. आज स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असूनही आपण जिममध्ये वर्कआउट करत असल्याचे विराटला दाखवायचे आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विराट लिहितो, ‘आज सुट्टी आहे मात्र धावावे तर लागेल.’
आशिया चषक 2023 यावेळी हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे, ज्यामध्ये चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत, बाकीचे सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील. आशिया कप 2023 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या आहेत. (हेही वाचा: Cricket On Railway Platform Video: रेल्वे स्टेशनवर क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा विडिओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)