खोट्या बातम्यांबद्दल Virat Kohli पुन्हा भडकला, इन्स्टावर पोस्ट करत लिहिले; 'लहानपणापासून जे वर्तमानपत्र वाचत होतो आता तेही..'

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेटच्या मैदानाबाहेर असला तरी त्याच्याबद्दलच्या चर्चेचा बाजार नेहमीच गरम असतो. पण आता भारतीय स्टारने तिच्याशी संबंधित खोट्या बातम्यांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

Virat Kohli And Anushka Sharma (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेटच्या मैदानाबाहेर असला तरी त्याच्याबद्दलच्या चर्चेचा बाजार नेहमीच गरम असतो.  पण आता भारतीय स्टारने त्याच्याशी संबंधित खोट्या बातम्यांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरून त्याच्या उत्पन्नाचा दावा करणाऱ्या बातम्या फेटाळल्यानंतर काही दिवसांनी, कोहलीने मंगळवारी आणखी एक वृत्त फेटाळून लावले ज्यात म्हटले होते की तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या अलिबाग फार्महाऊसवर 'क्रिकेट खेळपट्टी तयार करणार आहेत'. अखेर विराट कोहलीने प्रतिक्रिया देवुन नाराजी व्यक्त केली आहे. इंस्टाग्रामवर बातमीचा स्क्रीनशॉट टाकत त्याने लिहिले की, 'मी लहानपणापासून वाचत असलेल्या वर्तमानपत्राने आता फेक न्यूज छापायला सुरुवात केली आहे'. खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल कोहली खूपच नाराज असल्याचे या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement