Virat Kohli Record: विराट कोहलीची मोठी कामगिरी; इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा ठरला पहिला भरातीय खेळाडू
जर आपण क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्स एकत्र केले तर कोहलीने इंग्लंडविरुद्ध 8 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत.
Virat Kohli Record: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli ) इतिहास रचला. इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या 87 व्या सामन्यात विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा
डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) -63 डावात 5028
अॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) - 124 डावात 4850
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - 114 डावात 4815
व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) - 84 डावात 4488
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) - 99 डावात 4141
विराट कोहली (भारत) - 109 डावांमध्ये 4001
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डॉन ब्रॅडमन हा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहेत. त्याने 37 कसोटी सामन्यांमध्ये 5028 धावा करून या यादीत अव्वल स्थानावर आहे.
इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा