IND vs AUS 2nd Test Day: विराट कोहलीची विकेट ढापली! पंचाच्या निर्णायावर विराट संतप्त
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंच नितीन मेनन यांच्या एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माम झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट अंपायर आणि थर्ड अंपायर यांनी अक्षरशः ढापली. पंच नितीन मेनन (Nitin Menon) यांच्या या निर्णयावर सर्वांकडून टीका होत आहे. या सामन्यात कोहलीवर अन्याय झाला असे कॉमेंट्रीमधून माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर याला वाटले. तसेच भारताचा माजी कसोटीपट्टू वसिम जाफरने (Wasim zaffer) देखील पंचाच्या या निर्णयावर शंका व्यक्त केली. तसेच क्रिकेट चाहत्यांनी देखील ऑस्ट्रेलियाने रडी डाव खेळल्याचा आरोप सोशल मिडीयावर केला.
विराट कोहली ८४ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. कुहमानने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. अंपायरने कोहलीला बाद दिले, पण त्याने रिव्ह्यू घेतला. चेंडू एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसून आले, पण अंपायरने त्याला बाद घोषित केले.