Vinod Kambli Struggles to Walk: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची परिस्थितीत बिघडली; चालण्यासाठी धडपड, दयनीय अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल (Watch)
विनोद कांबळी आर्थिक संकटातून जात असताना सचिनने त्याला मदत केली होती. सचिनने त्याची एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय तो मुंबई टी-20 लीगमध्ये संघाचा प्रशिक्षकही झाला. मात्र यानंतर त्याची प्रकृती आणखी खालावली आणि त्यामुळे त्याला प्रशिक्षकपदाची नोकरी गमवावी लागली.
Vinod Kambli Struggles to Walk: एकेकाळी आपल्या बॅटने षटकार आणि चौकार मारणारा विनोद कांबळी आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकरचा जीवलग मित्र विनोद कांबळीला सध्या धड नीट चालताही येत नाही. विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बाईकचा आधार घेऊन उभा आहे. पण जेव्हा ते चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अडखळतो. त्यानंतर शेजारी उभे असलेले लोक त्याला आधार देतात. विनोद कांबळीला नक्की काय झाले याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या या माजी क्रिकेटपटूची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब आहे. विनोद कांबळीला अनेकदा या ना त्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला याआधी हृदयविकाराचा झटका आला असून, नैराश्यानेही ग्रासले आहे.
दरम्यान, अलीकडे विनोद कांबळी आर्थिक संकटातून जात असताना सचिनने त्याला मदत केली होती. सचिनने त्याची एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय तो मुंबई टी-20 लीगमध्ये संघाचा प्रशिक्षकही झाला. मात्र यानंतर त्याची प्रकृती आणखी खालावली आणि त्यामुळे त्याला प्रशिक्षकपदाची नोकरी गमवावी लागली. (हेही वाचा: Graham Thorpe Dies: माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प याचं निधन, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी वाहली श्रध्दांजली)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)