Vijay Hazare Trophy 2021 Quarterfinals: तामिळनाडू संघाकडून कर्नाटकचा 151 धावांनी पराभव; हिमाचल प्रदेशने UP वर विजय मिळवून गाठली उपांत्य फेरी

विजय हजारे देशांतर्गत वनडे मालिकेतील दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज खेळवण्यात आले. पहिल्या क्वार्टर-फायनल सामन्यात हिमाचल प्रदेशने उत्तर प्रदेशवर 5 विकेट्सने मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी 2021 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकचा 151 धावांनी पराभव केला आणि अंतिम 4 मध्ये स्थान निश्चित केले.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

एन जगदीसनचे शानदार शतक आणि त्यानंतर आर सिलंबरासन व वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर तामिळनाडूने (Tamil Nadu) विजय हजारे ट्रॉफी 2021 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकचा (Karnataka) 151 धावांनी पराभव केला. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशने (Himachal Pradesh) उत्तर प्रदेशवर (Uttar Pradesh) 5 विकेट्सने मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनय गलेटिया, सिद्धार्थ शर्मा आणि पंकज जैस्वाल यांची उत्कृष्ट गोलंदाजीनंतर प्रशांत चोप्राने 99 धावांची अप्रतिम खेळीने हिमाचल संघाला विजय मिळवून दिला.

तामिळनाडू

हिमाचल प्रदेश

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement