Pakistan च्या ‘या’ 39 वर्षीय धडाकेबाज फलंदाजाने तुफानी खेळी करत टी-20 मध्ये केला सर्वात मोठा विक्रम, क्रिस गेलच्या क्लबमध्ये घेतली एंट्री

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकने टी-20 क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. मलिकने फलंदाज म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा पल्ला गाठला आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये असा कारनामा करणारा मलिक तिसरा फलंदाज आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मलिकने गुरुवारी राष्ट्रीय टी-20 कप स्पर्धेदरम्यान सर्वात मोठी कामगिरी केली.

शोएब मलिक (Photo Credit: Twitter)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) अनुभवी फलंदाज शोएब मलिकने (Shoaib Malik) टी-20 क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. मलिकने फलंदाज म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा पल्ला गाठला आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये असा कारनामा करणारा मलिक तिसरा फलंदाज आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मलिकने गुरुवारी राष्ट्रीय टी-20 कप स्पर्धेदरम्यान सर्वात मोठी कामगिरी केली. आयसीसी टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या मलिक देशांतर्गत टी-20 स्पर्धेत चमकदार फलंदाजी करत या फॉरमॅटमध्ये 11,000 धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज बनला. याशिवाय पाकिस्तानचा अनुभवी मलिक टी-20 क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी मलिककडे एकूण 10,948 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत या सामन्यात एकूण 52 धावांसह त्याने टी-20 मध्ये 11,000 धावा पूर्ण केल्या आणि धाकड खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. (पाकिस्तानी कर्णधार Babar Azam च्या झंझावाती शतकाने वाढवली भारताची चिंता, T20 WC पूर्वी कोहलीला ओव्हरटेक करून एलिट यादीत रोहित शर्माची केली बरोबरी)

वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने (Chris Gayle) या फॉरमॅटमध्ये 448 सामन्यांमध्ये 14,276 धावा केल्या आहेत आणि किरोन पोलार्डने 567 टी-20 सामन्यांमध्ये 11,223 धावा केल्या आहेत. दरम्यान मलिकने एकूण टी-20 कारकीर्दीतील 1898 धावा आंतरराष्ट्रीय स्वरुपात केल्या आहेत. तर 5326 धावा टी-20 फ्रँचायझी लीगमध्ये आल्या आहेत जिथे त्याने पाकिस्तान सुपर लीग, मझांसी सुपर लीग, नेटवेस्ट टी-20 ब्लास्ट, ग्लोबल टी-20 कॅनडा, कॅरिबियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीगबांगलादेश प्रीमियर लीग आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय टी-20 चषकात मलिकने मध्य सेंट्रल पंजाबकडून खेळताना शानदार अर्धशतक झळकावले. त्याने फक्त 47 चेंडूत नाबाद 85 धावा ठोकल्या. सेंट्रल मध्य पंजाबने 155 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान सेंट्रल पंजाब सध्या सात सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, टी-20 क्रिकेट मलिकनंतर या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या खात्यात एकूण 10,088 धावा आहेत. तसेच रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर तो आठव्या क्रमांकावर आहे आणि त्याने एकूण 9428 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement