ENG vs AUS, 1st Test Day 2 Live Score Update: उस्मान ख्वाजाने झळकावले इंग्लंडमध्ये पहिले शतक, ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 14 धावा केल्या होत्या. दरम्यान, उस्मान ख्वाजाने इंग्लंडच्या भूमीवर पहिले शतक झळकावले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील अॅशेस मालिका 16 जूनपासून सुरू झाली आहे. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी एजबॅस्टन येथे खेळवली जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 14 धावा केल्या होत्या. दरम्यान, उस्मान ख्वाजाने इंग्लंडच्या भूमीवर पहिले शतक झळकावले आहे. ख्वाजाने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शतक पूर्ण केले आहे. उस्मान ख्वाजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे 15 वे शतक आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 304/5.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)