Anil Chaudhary On Mohammad Rizwan: तो जवळजवळ प्रत्येक चेंडूवर अपील करतो... अंपायर अनिल चौधरी यांनी मोहम्मद रिझवानची उडवली अशी खिल्ली! पाहा व्हिडिओ

असे म्हटले जाते की, पाकिस्तानचा हा यष्टिरक्षक जवळपास प्रत्येक चेंडूवर आऊटचे आवाहन करतो. पण मोहम्मद रिझवानच्या अपीलबद्दल पंचांना काय वाटतं? या प्रश्नाचे उत्तर अंपायर अनिल चौधरी यांनी दिले आहे.

Anil Chaudhary On Mohammad Rizwan (Photo Credit - X)

मुंबई: बांगलादेशविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने शानदार शतक झळकावले. मोहम्मद रिझवानने 239 चेंडूत नाबाद 171 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले. खरंतर, मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) मैदानावर विकेटकीपर म्हणून त्याच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की, पाकिस्तानचा हा यष्टिरक्षक जवळपास प्रत्येक चेंडूवर आऊटचे आवाहन करतो. पण मोहम्मद रिझवानच्या अपीलबद्दल पंचांना काय वाटतं? या प्रश्नाचे उत्तर अंपायर अनिल चौधरी यांनी दिले आहे. अनिल चौधरी (Anil Chaudhary) यांना पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले की, तुम्हाला पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानबद्दल माहिती आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात अनिल चौधरी म्हणाले की हो... मी आशिया कपमध्ये अंपायरिंग केले होते, मोहम्मद रिझवान त्या सामन्यात खेळत होता. तो जवळजवळ प्रत्येक चेंडूवर अपील करतो. यानंतर मी माझ्या सहकारी पंचांना सांगितले की, मोहम्मद रिझवान प्रत्येक चेंडूवर आऊटसाठी अपील करतो, त्यामुळे शहाणपणाने निर्णय द्या. मात्र, अनिल चौधरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.