U19 World Cup 2022: भारताचा अंडर 19 स्टार खेळाडू नेट सेशनमध्ये MS Dhoni याच्या हेलिकॉप्टर शॉटचा केला सराव, Video पाहून व्हाल अवाक
भारतीय अंडर-19 संघाचा स्टार खेळाडू राजवर्धन हंगरगेकरने वेस्ट इंडिजमध्ये नेट सेशनमध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. आयसीसीने इंस्टाग्रामवर भारताच्या नेट सत्रातील एक व्हिडिओ शेअर केला. विशेष म्हणजे हंगरगेकरने काही प्रसंगी हेलिकॉप्टर शॉट खेळला. हंगरगेकर मोठे फटके खेळण्यात माहीर आहे आणि डावाच्या शेवटी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.
एमएस धोनीने (MS Dhoni) त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हेलिकॉप्टर शॉट (Helicopter Shot) खेळून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आश्चर्यचकित केले. भारताचा अंडर-19 खेळाडू (India U19 Team) राजवर्धन हंगरगेकरने (Rajvardhan Hangargekar) वेस्ट इंडिजमध्ये सराव सत्रादरम्यान धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हंगरगेकरने या प्रसंगी धोनीचा सिग्नेचर शॉट अचूक खेळला. हंगरगेकरला धोनी-स्टाईल शॉट खेळताना पाहून सोशल मीडियावर नेटकरी देखील अवाक् झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)