U19 World Cup 2022: ‘बेबी एबी’ Dewald Brevis ने अंडर-19 विश्वचषकात घडवला इतिहास, शिखर धवनचा रेकॉर्ड मोडून पाडला धावांचा पाऊस

ब्रेव्हिसने या वर्षीच्या स्पर्धेत दोन शतक आणि तितक्याच अर्धशतकांसह विश्वचषकच्या एका आवृत्तीत सार्वधिक धावांचा भारतीय सलामीवीर शिखर धवनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.

देवाल्ड ब्रेविस (Photo Credit: Twitter/ICC)

U19 World Cup 2022: वेस्ट इंडिज (West Indies) येथे सुरु असलेल्या आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध झालेला देवाल्ड ब्रेव्हिसने (Dewald Brevis) बांगलादेशविरुद्ध सामन्यात इतिहास घडवला. ब्रेव्हिसने विश्वचषकच्या एका आवृत्तीत सार्वधिक धावांचा भारतीय सलामीवीर शिखर धवनचा (Shikhar Dhawan) वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. धवनने 2004 च्या आवृत्तीत 505 धावा चोपल्या होत्या तर ब्रेव्हिसने 506 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)