U19 World Cup 2022: दिनेश बानाने MS Dhoni स्टाईलमध्ये षटकार खेचून भारताच्या झोळीत टाकला विश्वचषक, ICC ने शेअर केला भारताच्या युवा ब्रिगेडचा विजयी क्षण
भारताच्या युवा ब्रिगेडने अँटिग्वामध्ये इतिहास रचला आणि अंडर-19 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत दमदार खेळ दाखवत इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करून विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद काबीज केले. दिनेश बानाने संघासाठी शानदार षटकार ठोकत भारताला विश्वविजेते बनवले आणि 2011 मध्ये एमएस धोनीने षटकार मारून भारताला 28 वर्षांनंतर 50 षटकांचा विश्वचषक जिंकून दिल्याच्या आठवणी उजागर झाल्या.
U19 World Cup 2022: अंडर-19 यष्टिरक्षक दिनेश बानाने इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात स्टायलिश षटकार मारून भारताच्या अँटिग्वा येथे अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला आणि भारताच्या 2011 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या प्रतिष्ठित शॉटच्या आठवणींना उजाळा दिला. धोनीने 49व्या षटकात नुवान कुलसेकरा मारून भारताच्या झोळीत 28 वर्षानंतर वर्ल्ड कप पाडला तो क्षण भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कायमचे कोरले गेला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)