U19 World Cup 2022: दिनेश बानाने MS Dhoni स्टाईलमध्ये षटकार खेचून भारताच्या झोळीत टाकला विश्वचषक, ICC ने शेअर केला भारताच्या युवा ब्रिगेडचा विजयी क्षण

भारताच्या युवा ब्रिगेडने अँटिग्वामध्ये इतिहास रचला आणि अंडर-19 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत दमदार खेळ दाखवत इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करून विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद काबीज केले. दिनेश बानाने संघासाठी शानदार षटकार ठोकत भारताला विश्वविजेते बनवले आणि 2011 मध्ये एमएस धोनीने षटकार मारून भारताला 28 वर्षांनंतर 50 षटकांचा विश्वचषक जिंकून दिल्याच्या आठवणी उजागर झाल्या.

U19 World Cup 2022: दिनेश बानाने MS Dhoni स्टाईलमध्ये षटकार खेचून भारताच्या झोळीत टाकला विश्वचषक, ICC ने शेअर केला भारताच्या युवा ब्रिगेडचा विजयी क्षण
दिनेश बानाने लगावला धोनी-स्टाईल सिक्स (Photo Credit: Instagram)

U19 World Cup 2022: अंडर-19 यष्टिरक्षक दिनेश बानाने इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात स्टायलिश षटकार मारून भारताच्या अँटिग्वा येथे अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला आणि भारताच्या 2011 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या प्रतिष्ठित शॉटच्या आठवणींना उजाळा दिला. धोनीने 49व्या षटकात नुवान कुलसेकरा मारून भारताच्या झोळीत 28 वर्षानंतर वर्ल्ड कप पाडला तो क्षण भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कायमचे कोरले गेला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2022 01:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).