ICC Cricket World Cup 2023: टीव्ही दर्शकांनी क्रिकेट विश्वचषकातील सर्व विक्रम काढले मोडीत, पहिल्या 18 सामन्यांचे थेट प्रक्षेपण 36.4 कोटी लोकांनी पाहिले

2019 मधील इंग्लंड आणि वेल्समधील मागील आवृत्तीपेक्षा हे 43 टक्के अधिक आहे, असे अहवालात म्हटले आहे.

सध्या सर्वत्र क्रिकेटची क्रेझ आहे आणि याचा पुरावा म्हणजे आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकातील (ICC Cricket World Cup 2023) टीव्ही दर्शकांनी विक्रम मोडले आहेत. शुक्रवारी डिस्ने स्टारने प्रदान केलेल्या BARC डेटानुसार, पहिल्या 18 टूर्नामेंट सामन्यांचे थेट प्रक्षेपण 123.8 अब्ज मिनिटे पाहण्यात आले आहे. 2019 मधील इंग्लंड आणि वेल्समधील मागील आवृत्तीपेक्षा हे 43 टक्के अधिक आहे, असे अहवालात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या प्रतिष्ठित स्पर्धेच्या पहिल्या 18 सामन्यांचे थेट प्रक्षेपण 364.2 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिले आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारताचा पाकिस्तानशी सामना झाला तेव्हा 76 दशलक्ष दर्शकांनी टेलिव्हिजनवर आणि 35 दशलक्ष डिजिटलवर लाइव्ह पाहिला, जो एक विक्रम ठरला. जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून आनंद व्यक्त केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif