ICC Champions Trophy 2025 Tour: 16 नोव्हेंबर रोजी Islamabad मार्गे Skardu, Murree, Hunza आणि Muzaffarabad या ठिकाणी होणार ट्रॉफीचा दौरा, पीसीबीने ट्विट करून दिली माहिती
दरम्यान, ट्रॉफी आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी इस्लामाबादला पोहोचली आणि आता ती 16 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत पाकिस्तानमध्ये फिरवली जाणार आहे. पीसीबीने याला दुजोरा दिला असून ट्रॉफी स्कार्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी जाईल असे सांगितले आहे.
ICC Champions Trophy 2025: क्रिकेटचे मैदान पुन्हा एकदा राजकीय डावपेचांचे आखाडे बनले आहे. 29 वर्षांनंतर पाकिस्तानात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आता वादांनी घेरली आहे. भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. त्याचे सामने दुबईत आयोजित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ट्रॉफी आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी इस्लामाबादला पोहोचली आणि आता ती 16 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत पाकिस्तानमध्ये फिरवली जाणार आहे. पीसीबीने याला दुजोरा दिला असून ट्रॉफी स्कार्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी जाईल असे सांगितले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर (X) एक पोस्ट शेअर केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लिहिलं की, तयार राहा पाकिस्तान. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ट्रॉफी दौऱ्याची सुरुवात 16 नोव्हेंबरपासून इस्लामाबाद येथे होणार आहे, जी स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद सारख्या पर्यटन स्थळांनाही भेट देईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)