SRH vs RR: ट्रॅव्हिस हेडने जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर मारला 105 मीटर लांब षटकार, पाहा व्हिडिओ

ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. यादरम्यान, त्याने जोफ्रा आर्चरला 105 मीटर लांब षटकार मारला आणि त्या षटकात एकूण 23 धावा केल्या. तुम्ही सिक्सचा व्हिडिओ खाली पाहू शकता.

SRH vs RR: ट्रॅव्हिस हेडने जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर मारला 105 मीटर लांब षटकार, पाहा व्हिडिओ
Travis Head (photo Cedit - X)

SRH vs RR, IPL 2025 2nd T20: आज आयपीएल 2025 चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान परागच्या हाती आहे. तर, हैदराबादसाठी पॅट कमिन्स ही भूमिका बजावतोय. गेल्या हंगामात हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचला होता. पण त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. यावेळीही हैदराबादचा संघ खूप मजबूत आहे. दुसरीकडे, राजस्थानला कमी लेखणेही चुकीचे ठरेल. दरम्यान राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने राजस्थानसमोर 287 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. यादरम्यान, त्याने जोफ्रा आर्चरला 105 मीटर लांब षटकार मारला आणि त्या षटकात एकूण 23 धावा केल्या. तुम्ही सिक्सचा व्हिडिओ खाली पाहू शकता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2025 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).