IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपन्न, इंग्लंडचा स्कोर 67/1, भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज

दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात एक विकेट गमावून इंग्लंडने 67 धावा केल्या आहेत. इंग्लिश संघाला विजयासाठी अद्याप 332 धावांची गरज आहे. त्याचवेळी भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे.

IND vs ENG 2nd Test Day 3 Live Score Update: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपन्न, इंग्लंडचा स्कोर 67/1, भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज

IND vs ENG 2nd Test Day 3: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात एक विकेट गमावून इंग्लंडने 67 धावा केल्या आहेत. इंग्लिश संघाला विजयासाठी अद्याप 332 धावांची गरज आहे. त्याचवेळी भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. इंग्लंडला एकमेव धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, तो अश्विनने यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद झाला. त्याला 28 धावा करता आल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जॅक क्रॉली 29 धावा आणि रेहान अहमद नऊ धावांसह खेळत होते. तत्पूर्वी, भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करत 396 धावावर बाद झाला. भारताचा युवा स्टार यशस्वी जैस्वालने शानदार दुहेरी शतक झळकावले. तसेच इंग्लंडचा संघ दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 253 धावांत गारद झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात भारतीय संघ 255 धावांवरच बाद झाला आहे. भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या खेळीत शुभमन गिलने 104 धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2024 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).