IND vs BAN 2nd Test 2022 Day 3 Live Streaming Online: तिसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्या वेळात होणार सुरुवात, कुठे पाहाला सामना घ्या जाणून
टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशने एकही विकेट न गमावता सात धावा केल्या. भारताकडे 80 धावांची आघाडी आहे.
IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशने एकही विकेट न गमावता सात धावा केल्या. भारताकडे 80 धावांची आघाडी आहे. या सामन्याला सुरवात भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे या मालिकेचे प्रसारण हक्क आहेत, त्यामुळे ते सोनी स्पोर्ट्स 3 वर हिंदी कॉमेंट्रीसह आणि सोनी स्पोर्ट्स 5 वर इंग्रजीमध्ये पाहता येईल. याशिवाय, भारतातील डीडी स्पोर्ट्सवरही ते प्रसारित केले जाईल. प्रसारण अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे असल्याने, ते त्याच्या थेट स्ट्रीमिंग अॅप Sony Liv वर पाहू शकतात.