Video: श्रीलंकेच्या यष्टीरक्षकाने विराट कोहलीला मागितले खास गिफ्ट, सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममधून बाहेर येऊन कोहलीने पूर्ण केली त्याची इच्छा; पाहा व्हिडिओ

या मालिकेत फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतरही श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने विराट कोहलीला खास मागणी घातली.

Photo Credit - X

IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका (IND vs SL ODI Series) संपुष्टात आली आहे आणि टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब झाली, परिणामी टीम इंडियाला मालिका 2-0 ने गमवावी लागली. तिसऱ्या वनडेत भारताचा 110 धावांनी पराभव झाला. संपुर्ण मालिकेत विराट कोहली विशेष काही करू शकला नाही आणि तो सपशेल फ्लॉप झाला. या मालिकेत फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतरही श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने विराट कोहलीला खास मागणी घातली. मेंडिसने विराटकडे स्वाक्षरी असलेली जर्सी मागितली होती. अशा परिस्थितीत कोहलीने मेंडिसची विनंती मान्य केली आणि सामना संपल्यानंतर त्याला जर्सी दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement