ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकाचे वेळापत्रक पुन्हा बदलणार, पाकिस्तानच्या आणखी एका सामन्यावर टांगती तलवार
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यातही बदल केले जाणार आहे. त्यामुळे आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने देखील भारतीय क्रिकेट बोर्डाला नोव्हेंबर रोजी होणारा इंग्लंड आणि पाकिस्तान (ENG vs PAK) सामना बदलण्याची विनंती केली आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ला (ODI World Cup 2023) आता दोन महिने बाकी आहेत पण आयसीसी आणि बीसीसीआयने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकात वारंवार बदल होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यातही बदल केले जाणार आहे. त्यामुळे आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने देखील भारतीय क्रिकेट बोर्डाला नोव्हेंबर रोजी होणारा इंग्लंड आणि पाकिस्तान (ENG vs PAK) सामना बदलण्याची विनंती केली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील लीग टप्प्यातील शेवटचा सामना 12 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील ऐतिहासिक मैदान असलेल्या ईडन गार्डन्सवर होणार आहे आणि त्याच दिवशी कोलकातामध्ये काली पूजेचा सणही साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सीएबीने बीसीसीआयला हा सामना रीशेड्यूल करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. काली पूजनाच्या उत्सवात पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार नसल्यामुळे CAB नेही ही विनंती केली आहे.
Kolkata Police has told the Bengal Cricket association that security deployment could be an issue for the Pakistan vs England match in the World Cup. [PTI] pic.twitter.com/51sCGAUPW7
— Johns. (@CricCrazyJohns) August 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2023 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

