Perth Scorchers ने फायनलमध्ये Brisbane Heat चा केला पराभव, BBL जिंकून पाचव्यांदा ट्रॉफीवर केला कब्जा
अंतिम सामन्यात बिस्बेन हीटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Perth Scorchers Win 5th KFC BBL Honor: ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी T20 लीग बिग बॅश लीगमध्ये (BBL) पर्थ स्कॉचर्सने (Perth Scorchers) बिस्बेन हीटचा (Brisbane Heat) पाच विकेट्स राखून पराभव करून पाचव्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. या विजयासह पर्थ स्कॉचर्सचा संघही स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. बिग बॅश लीगच्या 12व्या हंगामाचा अंतिम सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. अंतिम सामन्यात बिस्बेन हीटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बिस्बेन हीट संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 175 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पर्थ स्कॉचर्स संघाने 19.2 षटकांत पाच गडी गमावून (178) लक्ष्य गाठले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)