Perth Scorchers ने फायनलमध्ये Brisbane Heat चा केला पराभव, BBL जिंकून पाचव्यांदा ट्रॉफीवर केला कब्जा
बिग बॅश लीगच्या 12व्या हंगामाचा अंतिम सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. अंतिम सामन्यात बिस्बेन हीटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Perth Scorchers Win 5th KFC BBL Honor: ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी T20 लीग बिग बॅश लीगमध्ये (BBL) पर्थ स्कॉचर्सने (Perth Scorchers) बिस्बेन हीटचा (Brisbane Heat) पाच विकेट्स राखून पराभव करून पाचव्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. या विजयासह पर्थ स्कॉचर्सचा संघही स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. बिग बॅश लीगच्या 12व्या हंगामाचा अंतिम सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. अंतिम सामन्यात बिस्बेन हीटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बिस्बेन हीट संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 175 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पर्थ स्कॉचर्स संघाने 19.2 षटकांत पाच गडी गमावून (178) लक्ष्य गाठले.
Party time in Perth 🏆 #BBL12 pic.twitter.com/vLGgTixaEU
— KFC Big Bash League (@BBL) February 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2023 07:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

