Team India Arrived in Colombo: आशिया चषकासाठी श्रीलंकेत पोहचला भारतीय संघ, 2 सप्टेंबरला पाकिस्तानसोबत भिडणार (Watch Video)

टीम फ्लाइटने बुधवारी दुपारी बेंगळुरूहून निघाली, त्यानंतर काही वेळातच ते कोलंबोला पोहोचले. बंगलोरपासून श्रीलंकेचे अंतर अवघे दीड तासाचे आहे. भारतीय संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे.

आशिया कप 2023 (Asia Cup 2023) साठी भारतीय संघ (Team India) बुधवारी श्रीलंकेत पोहोचला. टीमचे सर्व सदस्य कोलंबो विमानतळावर दिसले. टीम फ्लाइटने बुधवारी दुपारी बेंगळुरूहून निघाली, त्यानंतर काही वेळातच ते कोलंबोला पोहोचले. बंगलोरपासून श्रीलंकेचे अंतर अवघे दीड तासाचे आहे. भारतीय संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. भारतीय खेळाडूंनी फ्लाइट टेक ऑफ करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहे. जिथे कर्णधार रोहित शर्मासोबत विराट कोहली, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराहसह इतर खेळाडूही दिसले.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement