'Kohli, Kohli' For Naveen Ul Haq: चाहत्यांनी नवीन उल हकला पुन्हा डिवचल, फलंदाजीला येताच 'कोहली-कोहली'च्या घोषणांनी स्टेडियम दुमदुमलं; पाहा व्हिडिओ
सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांना पुन्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांच्यातील लढतीची आठवण झाली. हा सामना कोहलीच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे, त्यामुळे चाहते नवीन उल हकला मैदानात चिडवताना दिसले.
विश्वचषकाचा दहावा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांना पुन्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांच्यातील लढतीची आठवण झाली. हा सामना कोहलीच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे, त्यामुळे चाहते नवीन उल हकला मैदानात चिडवताना दिसले. नवीन उल हक शेवटच्या षटकात फलंदाजी आला असताना दिल्लीच्या चाहत्यांनी कोहली-कोहलीच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. नवीन उल हकला चिडवण्यासाठी चाहते जाणूनबुजून कोहली-कोहलीच्या घोषणा देत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
Delhi crowd erupts with 'Kohli, Kohli' chants when Naveen Ul Haq was on strike. pic.twitter.com/GrkpAMSIgj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2023 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

