India World Cup Squad 2023: टीम इंडियाचा वर्ल्डकपसाठी संघ जाहीर, केएल राहुलला संघात स्थान

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांने संघाची निवड केली आहे. केएल राहुलला या संघात स्थान देण्यात आले आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा झाली आहे. ही स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांने संघाची निवड केली आहे. केएल राहुलला या संघात स्थान देण्यात आले आहे.

पाहा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), अक्षर पटेल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, विराट कोहली, जसप्रित बुमराह, श्रेयस अय्यर, मोहम्मद शामी, इशान किशन, मोहम्मद सिराज, केएल राहुल, कुलदिप यादव, हार्दिक पांड्या सुर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा

बीसीसीआयचे ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now