Team Indian चा स्टार अष्टपैलू खेळाडू Hardik Pandya दिसला सराव करताना, श्रीलंकेविरुद्ध करु शकतो टी-20 संघाचे नेतृत्व

दरम्यान, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. पुढील मालिकेसाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) जोरदार सराव करत आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

Hardik Pandya: सध्या टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी चितगावमध्ये खेळली जात आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. पुढील मालिकेसाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) जोरदार सराव करत आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर झालेला नाही. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे. एनसीएमध्ये तो जोरदार सराव करताना दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now