Team India's Squad for T20I Series: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 सिरीजसाठी भारतीय संघ जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाले स्थान

निवड समितीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कॅरिबियन बेटांवर, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळल्या जाणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा संघ निवडला.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड समितीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कॅरिबियन बेटांवर, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळल्या जाणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा संघ निवडला.

असा असेल भारताचा T20I संघ: इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

असा असेल भारताचा दौरा- 3 ऑगस्ट रोजी पहिला T20I सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद येथे होणार आहे. त्यानंतर 6 ऑगस्टला दुसरा T20I सामना प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे होईल. याच ठिकाणी 8 ऑगस्ट रोजी तिसरा सामना होईल. त्यानंतर 12 व 13 ऑगस्टला सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे चौथा आणि पाचवा सामना होईल. (हेही वाचा: IND vs WI Series 2023: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाने वेस्ट इंडिजचे दिग्गज सर गारफिल्ड सोबर्स यांची घेतली भेट, व्हिडिओ आला समोर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now