Team India Vijay Yatra: मरीन ड्राइव्हवर संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान निघणार भारतीय संघाची विजय मिरवणूक; चाहत्यांना साडेचार आधी पोहोचण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

वर्ल्ड कपमधील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत टीम इंडियाची विजयी परेड काढली जाणार आहे.

Team India (Photo Credt - X)

Team India Vijay Yatra: टी-20 विश्वचषक 2024 जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचणार आहे. वर्ल्ड कपमधील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत टीम इंडियाची विजयी परेड काढली जाणार आहे. उद्या मुंबईत होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेबाबत, मुंबई पोलिसांचे डीसीपी झोन 1 प्रवीण मुंडे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘ भारतीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषक जिंकून उद्या मुंबईत पोहोचत आहे. येथून खुल्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येत आहे. नरिमन पॉईंट आणि वानखेडे स्टेडियम दरम्यान मरीन ड्राइव्हवर सायंकाळी 5 ते 7 दरम्यान ही मिरवणूक निघणार आहे. चाहत्यांनी 4:30 च्या आधी पोहोचा. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये विजयाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. जर तुम्हाला यासाठी हजेरी लावायची असेल तर कृपया तुम्ही 6 वाजेपूर्वी स्टेडियममध्ये पोहोचा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा प्रयत्न करा.’ (हेही वाचा: Team India's Mumbai Road Show: उद्या मुंबईमध्ये होणार टीम इंडियाचा रोड शो; पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now